महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होताच 'आरंभ..' म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. महायुतीच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या माध्यमातून मतदार निवडणुकीत महायुतीला मतरुपी आशीर्वाद देतील, असा दावा सातत्याने फडणवीस करीत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित असताना तेथील महिलावर्ग राखी बांधतानाचे फोटो फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तसेच विविध राजकीय सभांना हजेरी लावत असल्याचे फोटो आणि भाषण करीत असल्याचे फोटो व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. याचाच अर्थ पुढच्या एक महिन्यात राजकीय रणांगणात काय काय होणार आहे, याची झलक फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.
advertisement
Nanded Lok Sabha by-election : नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान
फडणवीस काय म्हणाले?
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय... असे फडणवीस म्हणाले.
कधी होणार निवडणूक, निकाल कधी लागणार?
पहिला टप्प्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना लागू होईल.
नामांकन दाखल करण्याची मुदत- २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ रोजी असेल
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ४ नोव्हेंबर २०२४
मतदान कधी असेल- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असेल
मतमोजणी निकाल कधी असेल- २३ नोव्हेंबर नोव्हेंबर
