Nanded Lok Sabha by-election : नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

Last Updated:

ECI announced Nanded Lok Sabha by-election : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं. अशातच आता विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे.

ECI announced Nanded Lok Sabha by-election
ECI announced Nanded Lok Sabha by-election
Nanded Lok Sabha by-election : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने नांदेडची जागा रिक्त झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला 30 ऑगस्ट रोजीच कळविली होती. त्यामुळे देशातील दोन जागांवर लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागली आहे. तर राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला होता. या जागेवर देखील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
advertisement
देशातील 2 लोकसभेची जागा आणि 15 विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झालीये. त्याचा संपूर्ण कार्यक्रम देखील जाहीर झालाय. महाराष्ट्रात नांदेडच्या जागेवर पोटनिवडणूक लागल्याने निवडणूक बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
नांदेड पोटनिवडणुकीचं वेळापत्रक
नामांकन दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ पर्यंत असेल. तर दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख ३० ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस ४ नोव्हेंबर २०२४ असेल. त्यानंतर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल. तर अंतिम प्रक्रिया म्हणजेच मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पार पडणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded Lok Sabha by-election : नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement