Milk : पॅकेटचं दूध उकळावं की थेट प्यावं? काय आहे योग्यपद्धत, अनेकांना याबद्दल चुकीचा समज

Last Updated:
दूध उकळण्याची आपली सवय मुळात जुन्या काळात कच्च्या दुधातील (Raw Milk) जंतू नष्ट करण्यासाठी सुरू झाली होती. पण, आता बाजारात मिळणारे पॅकेटबंद दूध दोन मुख्य प्रकारच्या आधुनिक प्रक्रियांतून जाते.
1/9
दुध ही प्रत्येक घरातील महत्वाचा आणि दररोज लागणारा पदार्थ आहे. पण आपण त्याला साठवून ठेवू शकत नाही कारण तो खराब होतो. त्यामुळे लोक दररोज सकाळी तो विकत घेतात किंवा दूध विक्रेता त्याला घरी येऊन देऊन जातो. दूध घेतल्यानंतर आपल्या प्रत्येकाची सवय असते की आपण तो सर्वात आधी गरम करतो. त्यानंतर त्याचा वापर झाला की तो आपण फ्रीजमध्ये ठेवतो जेणे करुन तो खराब होणार नाही.

advertisement
2/9
पण आता लोकांचं रहाणीमान आणि लाइफस्टाऊल थोडी बदलली आहे. त्यामुळे हल्ली लोक फॅन्सी किंवा कधीकधी अपग्रेडवर्जनच्या गोष्टी घरी आणू लागले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे पॅकेट दूध. आता लोक पॅकेट दूध तर घेतात, पण ते सवयीप्रमाणे हे दूध देखील गरम करुन वापरतात किंवा पितात. पण तुम्हाला माहितीय का ही तुम्ही खूप मोठी चूक करताय.

3/9
पॅकेट दूध कधीही गरम करायचं नसतं, हो तुम्ही बरोबर वाचलंत. पण का? असा प्रश्न देखील तुम्हाला नक्कीच पडला असेल? चला यामागिल सायन्स समजून घेऊ, म्हणजे पुढच्यावेळेसाठी तुम्ही ती चूक टाळू शकता.दूध उकळण्याची आपली सवय मुळात जुन्या काळात कच्च्या दुधातील (Raw Milk) जंतू नष्ट करण्यासाठी सुरू झाली होती. पण, आता बाजारात मिळणारे पॅकेटबंद दूध दोन मुख्य प्रकारच्या आधुनिक प्रक्रियांतून जाते.

4/9
प्रक्रिया: यात दूध 135 ते 150 डिग्री सेल्सियवर तापमानावर फक्त 2 ते 5 सेकंदांसाठी गरम केले जाते आणि नंतर निर्जंतुक पॅकेटमध्ये बंद केले जाते. या अत्यंत उच्च तापमानामुळे सर्व सूक्ष्मजीव आणि त्यांचे बीजाणू पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे हे दूध न उघडल्यास, रेफ्रिजरेशनशिवाय 3 ते 6 महिने सुरक्षित राहू शकते.

5/9
या दोन्ही प्रक्रियेमुळे पॅकेटबंद दूध कीटाणूमुक्त आणि पिण्यासाठी सुरक्षित असते. त्यामुळे, विज्ञान आणि दूध तंत्रज्ञान स्पष्टपणे सांगतात की, पॅकेटमधील पाश्चुरीकृत किंवा UHT दूध पुन्हा उकळण्याची आवश्यकता नाही.

6/9
पॅकेटमधील दूध कधी गरम करावे?दुधाला पुन्हा उकळू नका, पण तुम्ही खालील दोन परिस्थितीत त्याला हलके गरम करू शकता:
1. गरम पिण्यासाठी: जर तुम्हाला गरम दूध पिण्याची इच्छा असेल तर आणि 2. सुरक्षिततेसाठी: जर एकदा पॅकेट उघडल्यानंतर दूध अनेक तास खोलीच्या तापमानावर (Room Temperature) राहिले असेल. लक्षात ठेवा, उघडलेले पॅकेट नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि 2-3 दिवसांत वापरा.
पॅकेटमधील दूध कधी गरम करावे?दुधाला पुन्हा उकळू नका, पण तुम्ही खालील दोन परिस्थितीत त्याला हलके गरम करू शकता:1. गरम पिण्यासाठी: जर तुम्हाला गरम दूध पिण्याची इच्छा असेल तर आणि 2. सुरक्षिततेसाठी: जर एकदा पॅकेट उघडल्यानंतर दूध अनेक तास खोलीच्या तापमानावर (Room Temperature) राहिले असेल. लक्षात ठेवा, उघडलेले पॅकेट नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि 2-3 दिवसांत वापरा.
advertisement
7/9
दूधवाल्याकडून घेतलेले कच्चे दूध का उकळावेच लागते?दूधवाल्याकडून येणारे किंवा घरचे ताजे दूध उकळणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, कारण हे दूध अप्रक्रियाकृत असते आणि त्यात ई.कोली, साल्मोनेला तसेच अन्य हानिकारक जीवाणू, विषाणू (Virus) किंवा परजीवी असू शकतात. जनावराचे आरोग्य, दूध काढण्याची अस्वच्छ पद्धत आणि दूषित भांड्यांमध्ये साठवणूक यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
कच्चे दूध सुमारे 100 डिग्री तापमानावर 10 ते 15 मिनिटे उकळल्याने सर्व हानिकारक सूक्ष्मजीव आणि त्यांचे बीजाणू नष्ट होतात, ज्यामुळे ते पिण्यास सुरक्षित होते.
दूधवाल्याकडून घेतलेले कच्चे दूध का उकळावेच लागते?दूधवाल्याकडून येणारे किंवा घरचे ताजे दूध उकळणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, कारण हे दूध अप्रक्रियाकृत असते आणि त्यात ई.कोली, साल्मोनेला तसेच अन्य हानिकारक जीवाणू, विषाणू (Virus) किंवा परजीवी असू शकतात. जनावराचे आरोग्य, दूध काढण्याची अस्वच्छ पद्धत आणि दूषित भांड्यांमध्ये साठवणूक यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते.कच्चे दूध सुमारे 100 डिग्री तापमानावर 10 ते 15 मिनिटे उकळल्याने सर्व हानिकारक सूक्ष्मजीव आणि त्यांचे बीजाणू नष्ट होतात, ज्यामुळे ते पिण्यास सुरक्षित होते.
advertisement
8/9
पॅकेटबंद दूध पिण्यासाठी सुरक्षित असते, त्याला पुन्हा उकळून आपण त्यातील पोषक तत्वे गमावतो. त्यामुळे, जर दूध थेट प्यायचे असेल, तर ते उकळू नका.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement