Maharashtra Election 2024 Schedule: फॉर्म कधी भरायचा? माघार घेण्याची तारीख काय? निकाल कधी? आयोगाचा संपूर्ण कार्यक्रम
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Election 2024 Schedule in Marahti : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत. विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एकाच टप्प्यांत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
कधी होणार निवडणूक, निकाल कधी लागणार?
एकच टप्प्यांत मतदान होणार- २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना लागू होईल.
नामांकन दाखल करण्याची मुदत- २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ रोजी असेल
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ४ नोव्हेंबर २०२४
advertisement
मतदान कधी असेल- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असेल
मतमोजणी निकाल कधी असेल- २३ नोव्हेंबर नोव्हेंबर
एकूण जागा-288
नवमतदार- 19 लाख 48 मतदार
एकूण मतदार- 9 कोटी 59 लाख
पुरुष मतदार-4 कोटी 59 लाख
महिला मतदार -4 कोटी 64 लाख
दिव्यांग मतदार- 6 लाख 32 हजार
85 वर्षांवरील मतदार- 12 लाख 48 हजार
advertisement
शंभरी ओलांडलेले मतदार- 49 हजाराहून अधिक
कुठे किती जागा?
विदर्भ - 62 जागा
खानदेश - 47 जागा
मराठवाडा - 46 जागा
कोकण - ठाणे - 39 जागा
मुंबई - 36 जागा
पश्चिम महाराष्ट्र - 58 जागा
महाराष्ट्र राज्य विधानसभा राखीव मतदारसंघ
अनुसूचित जाती- २९ मतदारसंघ
अनुसूचित जमाती- २५ मतदारसंघ मतदारसंघ
2019 चं पक्षीय बलाबल
advertisement
एकूण जागा -288
भाजप - 105
शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 54
काँग्रेस - 44
बविआ - 3
मनसे - 1
एमआयएम - 2
समाजवादी पक्ष - 2
प्रहार - 2
जनसुराज्य - 1
स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 1
शेकाप - 1
रासप - 1
भाकप - 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 1
advertisement
अपक्ष - 13
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 3:57 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Election 2024 Schedule: फॉर्म कधी भरायचा? माघार घेण्याची तारीख काय? निकाल कधी? आयोगाचा संपूर्ण कार्यक्रम