IPL Auction 2026 : दुसऱ्या टी20त डिकॉकने हवा केली, पण 16 तासातच जबर झटका,भारताच्या युवा खेळाडूने पाडले भाव

Last Updated:

साऊथ आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने 90 धावांची वादळी खेळी केली होती. क्विंटन डिकॉकच्या या खेळीनंतर तो प्रचंड हवेत होता. त्याला वाटलं आता आयपीएलमध्ये मोठी बोली लागेल.पण आता सामन्यानंतरच्या 16 तासातच त्याला मोठा झटका बसला आहे.

quiton de cock
quiton de cock
IPL Auction 2026 : न्यू चंदीगढच्या मुल्लानपूर स्टेडिअमध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा 51 धावांनी पराभव केला आहे. या विजयात साऊथ आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने 90 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीमुळेच त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता. क्विंटन डिकॉकच्या या खेळीनंतर तो प्रचंड हवेत होता. त्याला वाटलं आता आयपीएलमध्ये मोठी बोली लागेल.पण आता सामन्यानंतरच्या 16 तासातच त्याला मोठा झटका बसला आहे. कारण आयपीएल ऑक्शनआधीच एका भारतीय युवा खेळाडूने त्याचे भाव पाडले आहे. हा भारतीय खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर 16 डिसेंबर 2025 ला आयपीएला मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाआधी सर्वच खेळाडू आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांना आयपीएलमध्ये चांगली बोली लागेल.याच प्रयत्नातून गुरूवारी क्विंटन डिकॉकने 90 धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहता या विकेट किपर बॅटरला आयपीएलमध्ये मोठी लागेल अशी डिकॉकला आशा होती. पण डिकॉकच्या या आशेवर 16 तासातच भारतीय खेळाडूने पाणी फेरले आहे.
advertisement
क्विंटन डिकॉक हा मागचा हंगाम कोलकत्ता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळला आहे. आणि यंदाच्या हंगामात या विकेटकिपर, बॅटरला कोलकत्ताने रिटेनच केले नव्हते. त्यामुळे यंदा तो 1 कोटीच्या बेसप्राईजच्या रक्कमेवर लिलावात उतरला आहे. पण या लिलावाआधीच मोठा गेम झाला आहे.
त्याचं झालं असं की कोलकत्ता नाईट रायडर्स भारताच्या एका युवा खेळाडूला संघात घेण्यास इच्छुक आहे. सलील अरोरा असे या खेळाडूचे नाव आहे.या खेळाडूने आज 45 बॉलमध्ये 125 धावांनी नाबाद खेळी केली.या खेळीत त्याने 11 षटकार आणि 9 चौकार मारले होते. 277 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या होत्या. सलील एक बॅटर आणि विकेटकिपर देखील आहे.त्यामुळे सलीलच्या या खेळीने क्विंटन डिकॉकचे भाव पूर्णपणे उतरले आहेत.विषेश म्हणजे आता कोलकत्ताला कमी पैशात बॅटर आणि विकेटकिपर मिळणार आहे. त्यामुळे क्विंटन डिकॉकच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
आता कोलकत्ता नाईट रायडर्स सलील अरोराला संघात घेते की क्विंटन डिकॉकला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : दुसऱ्या टी20त डिकॉकने हवा केली, पण 16 तासातच जबर झटका,भारताच्या युवा खेळाडूने पाडले भाव
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement