या संदर्भात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की, मोठा गाव येथील फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी केली होती. या मागणीस रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. रेल्वेने दोनपदरी पुलाला मान्यता दिली असून वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी एक पदरी पूल चारपदरी करावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून चारपदरी या पुलाच्या भूसंपादनासाठी 130 कोटींचा खर्च येणार आहे, असे म्हटले आहे. या पुलाच्या कामात बाधित होणाऱ्यांना आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला मिळणार आहे. तसे या प्रस्तावात म्हटले असून बाधितांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे मान्य केले आहे.
advertisement
माणकोली उड्डाणपुलाशी जोडल्या जाणाऱ्या या रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वानंतर तासाभराचा कालावधी वाहनांचा वेळ वाचणार आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेने या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती. सरकारने या पुलासाठी 168 कोटींचा निधी मंजूर केला आहे. डोंबिवली ठाणे मार्गावरील मोठागाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम लांबले होते. भविष्यात वाढणाऱ्या वाहतूक भाराचा विचार करून दोनऐवजी चार पदरी उड्डाणपूल व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातील 600 बाधितांना 68 कोटींची भरपाई दिली जाणार असल्याने सांगितले आहे. मालगाड्यांची मोठ्या संख्येने वाहतूक होत असल्याने दिवा- वसई मार्गावर शटल सेवा तसेच मालगाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
डोंबिवली खाडीदरम्यान मोठागाव-माणकोल खाडी पूल बांधला मोठागाव ते कोपर तयार केला जात आहे, याशिवाय वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले. या प्रकल्पानंतर वाहतूककोंडी दूर होईल असा विश्वास यावेळी संबंधितांकडून व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद मिळाल्याने उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याची मागणी नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार केली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी चार पदरी पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
मंजूर निधीचे विभाजन
- कामाचा प्रकार मंजूर निधी २४ मी.
- रस्त्याचे भूसंपादन ७२.७५ कोटी
- पुलाचे बांधकाम ५.५८ कोटी
- पोहोच रस्ते ८४ कोटी
- देवीचापाडा मंदिराजवळ बोगदा ३ कोटी
- महापालिका रेल्वेकडे ३८ कोटी भरणार
रेल्वे फाटक बंद करून प्रस्तावित उड्डाणपूल हा दोनऐवजी चारपदरी असणे गरजेचा आहे. पुलासाठी महापालिका रेल्वेला 50 टक्के खर्चाचा हिस्सा देणार आहे. त्यानुसार 38 कोटी रुपयांची रक्कम पालिका रेल्वेकडे भरणार आहे.
