TRENDING:

Shocking Incident : दारूच्या नशेत सैतान झाला पती, सल्ला देणाऱ्या पत्नीवर...; भाईंदर हादरले

Last Updated:

Bhayandar News : भाईंदरमध्ये एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे आणि कधी घडले याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भाईंदर परिसरात कौटुंबिक वादाचे गंभीर रूप समोर आले आहे. दारू पिण्याच्या सवयीला विरोध केल्याच्या रागातून एका पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भाईंदर पश्चिमेकडील जय अंबे नगर परिसरात घडली. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे.
News18
News18
advertisement

दारूच्या व्यसनाचा भयानक शेवट

सुधा सोनू सहानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या रविवारी दुपारी आपल्या घरात कपडे धुण्याचे काम करत होती. याच दरम्यान तिचा नवरा सोनू सहानी (वय 35) हा दारूच्या नशेत घरी आला. दरदिवशी प्रमाणे दारू पिऊन घरी येण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुधाने नवऱ्याला वारंवार दारू न पिण्याचा सल्ला दिला आणि अशा अवस्थेत घरी येऊ नका असेही सांगितले.

advertisement

याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने घरात असलेल्या चाकूने पत्नीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुधा गंभीर जखमी झाली आहे. घटना स्थळी तिच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी आरोपी पतीला ठोकल्या बेड्या

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराचा हा आणखी एक धक्कादायक प्रकार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : दारूच्या नशेत सैतान झाला पती, सल्ला देणाऱ्या पत्नीवर...; भाईंदर हादरले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल