मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडच्या कुरार परिसरात दोन गटामध्ये भर रस्त्यावर मारामारी झाली आहे. यावेळी तलवारीने एका तरुणावर वार करण्यात आला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील कुरार परिसरात ही घटना घडली आहे. दोन गटांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. वादाचे रुपातर मारामारी झालं. दोन गटामध्ये हा वाद पैशांवरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारामारी करत दोन्ही गट रस्त्यावर आले.
advertisement
या व्हिडीओमध्ये काही जण एकमेकांवर तलवारीने हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाद नेमका कशामुळे आणि कोणत्या कारणातून झाला, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून दोन गटांमध्ये हा संघर्ष उफाळून आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपीची नाव अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
