घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अंदाजे दोन वाजता भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पेट्रोलिंग करताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोन व्यक्तींना उचलण्यासाठी पोलिसांनी गाडी उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या कारनं पोलिसांच्या वाहानाला धडक दिली.
advertisement
वाहनांचं नुकसान
या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणात चालकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2023 9:37 AM IST
