तरुणांच्या डोक्यात भरलंय सोन्याचं खूळ
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपींनी चिमुकल्याला आधीच खाऊचे आमिष दाखवून फूस लावली आणि एका ठिकाणी नेले. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलाच्या कानातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.
अवघ्या 24 तासांत प्रकरणाचा छडा
advertisement
पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करुन अवघ्या 24 तासांच्या आत दोन्ही या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे मोठा गुन्हा होण्यापासून टळला असल्याचे बोलले जात आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद बशीर उर्फ उबेर सलीम शेख(वय25) आणि अरबाज झाहिदअली पठाण उर्फ अल्लू( वय24)अशी आहेत. हे दोघेही विक्रोली पूर्व परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलेली असून यादोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
