TRENDING:

संसार सांभाळत बिझनेस सुरू केला, 7 हजार रुपये गुंतवले अन् आता महिन्याला 7 लाख कमाई

Last Updated:

मेघा नाईक यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा साड्यांचा व्यवसाय उभारला आहे. मेघा नाईक यांचे लग्न कमी वयात झाले. त्यानंतर संसाराची जबाबदारी आणि मातृत्वाची नवी भूमिका स्वीकारत असतानाच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: मेघा नाईक यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा साड्यांचा व्यवसाय उभारला आहे. बारावी (कॉमर्स) पर्यंत शिक्षण झालेल्या मेघा नाईक यांचे लग्न कमी वयात झालं. त्यानंतर संसाराची जबाबदारी आणि मातृत्वाची नवी भूमिका स्वीकारत असतानाच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2017 साली, अवघ्या सहा महिन्यांच्या लहान मुलाची आई असताना, मेघा नाईक यांनी साड्यांच्या व्यवसायात पाऊल ठेवले. या निर्णयामागे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द होती. या प्रवासात त्यांना कुटुंबाचा आणि विशेषतः पतीचा मोलाचा पाठिंबा लाभला.
advertisement

सुरुवातीच्या काळात त्या घरोघरी जाऊन साड्या दाखवत, ग्राहकांशी थेट संवाद साधत विक्री करत होत्या. त्यानंतर विविध प्रदर्शनांमध्ये आणि एक्झिबिशनमध्ये सहभागी होत त्यांनी आपला व्यवसाय हळूहळू विस्तारला. मेहनत, सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत गेला. यानंतर त्यांनी पुढचे पाऊल उचलत स्वतःचा टेक्सटाईल व्यवसाय सुरू केला. साड्यांची होलसेल विक्री तसेच मॅन्युफॅक्चरिंगही त्यांनी स्वतःच सुरू केली. कोणत्याही इतरत्र मदतीशिवाय मेघा यांनी आणि त्यांच्या पतीने केवळ स्वतःच्या कमाईवर आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

आज त्या उत्तम दर्जाच्या साड्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देत आहेत. अनेक महिलांना महागड्या साड्या परवडत नाहीत, ही गरज ओळखून त्यांनी कमी किंमतीत चांगल्या गुणवत्तेच्या साड्या देण्याचा निर्णय घेतला. केवळ सात हजार रूपयांची गुंतवणूक करून सुरू केलेला हा व्यवसाय आज महिन्याला सुमारे सात लाख रूपयांची उलाढाल करत आहे. नवी मुंबईतील मेघा नाईक यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आत्मविश्वास आणि मेहनतीने कोणतेही स्वप्न साकार करता येते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
संसार सांभाळत बिझनेस सुरू केला, 7 हजार रुपये गुंतवले अन् आता महिन्याला 7 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल