मुंबई सेंट्रल आणि परळ डेपोमधून कोकण मार्गावर रोज 12 बस धावतात. तसेच ठाणे आणि पालघरमधूनदेखील कोकणात जाण्यासाठी नियमित बस असतात. या बसचे बुकिंग 23 जून ते 27 जून या कालावधीमध्ये फुल्ल झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त 5 हजार बसची तरतूद करण्यात आली आहे. या बसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, 22 जुलैपासून जादा बसेसमधील गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये इतर व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सवलती देखील मिळणार आहेत.
advertisement
Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! मेट्रोच्या ताफ्यात 3 नव्या गाड्या, कोणत्या मार्गावर धावणार?
सुरक्षित वाहतुकीसाठी एसटीची तयारी
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी प्रयत्नशील आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बसस्थानक व बसथांब्यावर कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती उत्सवात कोकणात जाताना बसने आरामदायी प्रवास होणार आहे.