Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! मेट्रोच्या ताफ्यात 3 नव्या गाड्या, कोणत्या मार्गावर धावणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. आरामदायी आणि सुखकर प्रवासासाठी मेट्रोच्या ताफ्यात 3 नव्या गाड्या दाखल होत आहेत.
मुंबई : मेट्रो आणि बेस्ट सेवेनंतर मुंबईकरांची मेट्रो प्रवासालाही पसंती मिळत आहे. अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील प्रवाशांच्या संख्याते वाढ होत आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुकर करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने या मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांचा ताफा वाढवला आहे. आजपासून या मार्गावर तीन व्या गाड्या धावणार आहेत.
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिका पश्चिम उपनगरवासियांसाठी महत्त्वाच्या मेट्रो मार्गिका आहेत. त्यामुळेच या मार्गिकांना मुंबईकरांचा प्रतिसाद वाढत आहे. आता मेट्रोच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या दाखल झाल्याने 21 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गिकांवर एकूण 284 फेऱ्या होतात. आता 16 जुलैपासून या मार्गिकांवर 305 फेऱ्या होतील.
advertisement
दिवसाला 3 लाख प्रवासी
मेट्रो सेवा सुरू झाली तेव्हा या मार्गिकांवरून दिवसाला केवळ 30 हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र, 2024 पासून प्रवासी संख्येत झपाट्ये वाढ होत गेली आहे. त्यामुळे आता दिवसाला जवळपास अडीच ते तीन लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. नुकतेच या मार्गिकांवर दैनंदिन प्रवासी संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलकडून नव्या गाड्या ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय झाला.
advertisement
गर्दीच्या वेळी 5.50 मिनिटांनी गाडी
सध्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर दिवसाला 284 फेऱ्या होतात. आता तीन नव्या गाड्यांची भर पडल्याने 21 फेऱ्या वाढणार असून दिवसाला 305 फेऱ्या होतील. तर गर्दीच्या काळात पूर्वी 6.35 मिनिटांनी गाडी सुटत होती. आता याची वारंवारिता सुधारणार असून 5.50 मिनिटांनी एक गाडी सोडली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोवरील ताण कमी होणार असून आरामदायी आणि सुखकर प्रवास होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा! मेट्रोच्या ताफ्यात 3 नव्या गाड्या, कोणत्या मार्गावर धावणार?