Mumbai e-Water Taxi: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता 1 ऑगस्टपासून धावणार ई-वॉटर टॅक्सी

Last Updated:

Mumbai e-Water Taxi: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 ऑगस्टपासून देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे.

Mumbai e-Water Taxi: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता 1 ऑगस्टपासून धावणार ई-वॉटर टॅक्सी
Mumbai e-Water Taxi: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता 1 ऑगस्टपासून धावणार ई-वॉटर टॅक्सी
मुंबई: देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. 1 ऑगस्टपासून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गांवर ही ई-वॉटर टॅक्सी नियमितपणे धावणार आहे. पुढील काळात ही सेवा केवळ एका मार्गापुरती न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत असल्याने मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे ही पर्यावरणपूरक ई-वॉटर टॅक्सी परदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली आहे. 'एमडीएल'ने एकूण सहा वॉटर टॅक्सी तयार केल्या असून त्यातील पहिली 24 आसनी वातानुकूलित टॅक्सी सध्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
advertisement
परवडणाऱ्या दरात सेवा
मुंबईत विविध मार्गांवर यापूर्वीच वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या असून त्याचे तिकीटदर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे काही काळातच त्या सेवा बंद पडल्या. मात्र ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
advertisement
आठवड्यात तयार होणार चार्जिंग स्टेशन
ई-वॉटर टॅक्सीसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस, जेएनपीए जेट्टीवर चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे. जेएनपीएमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम आठवड्यात पूर्ण होईल. त्यामुळे देशांतर्गत पातळीवरच वॉटर टॅक्सीची सर्व साखळी निर्माण होणार आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai e-Water Taxi: मुंबईकरांसाठी खूशखबर! आता 1 ऑगस्टपासून धावणार ई-वॉटर टॅक्सी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement