इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लोहार चाळ ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे 400 ते 500 दुकानं आहेत.मुंबईच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग सध्या वाढलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या पन्नास रुपयापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इथं पाहायला मिळतात.
10 थरांचं ध्येय, 500 हून अधिक गोविंदा; मुंबईतलं जय जवान पुन्हा रचणार नवा रेकॉर्ड?
advertisement
सजावटीसाठी लागणारे पारंपारिक तोरण या बाजारपेठेत पन्नास ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पॉटलाईट, पारलाईट बायसन, असे अनेक पर्याय आहेत. सध्याच्या ट्रेंडिगनुसार फ्लॅक्स नियॉन नावांमध्ये गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः, बाप्पा मोरया, कस्टमर पद्धतीने देखील तयार करून मिळतं. गणेश मंडळांसाठी लागणारे वेगवेगळे लायटिंगचे प्रकार देखील या बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
यावर्षी ट्रेंडिंगच्या लाईटचे अनेक प्रकार उपलब्ध असून त्याला चांगली मागणी आहे. तोरण स्पॉटलाईट, नेमप्लेट, डिस्को लाईट, एलईडी लाईट, असे अनेक प्रकार या बाजारपेठेत आहेत. ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे, अी माहिती येथील दुकानदार कृष्णा चव्हाण यांनी दिली.