शिल्लक घरांची विक्री जोरात
म्हाडाच्या घरांचे प्रकल्प मुंबईसह अनेक उपनगरात सुरु आहेत. आतापर्यंत अनेक उपनगरातील प्रकल्पातील घरांची लॉटरी निघाली असून लाखोंजणांना त्यांच्या हक्कांची घरं मिळाली आहेत. पण यात अनेकदा काही अडचणींमुळे काही घरं तसेत विक्री विना राहिलेली असतात. आता त्यात विक्रीअभीव अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या म्हाडांच्या घरांनी परत एकदा खरेदीदार मिळू लागले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे गेल्या महिन्यातच या घराच्या विक्रीमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे.
advertisement
नेमकी कोणत्या परिसरातील घरांची विक्री झाली?
कोकण मंडळात असलेल्या विरार बोळींज तसेच गोठेघर आणि भंडार्ली या भागांतील घरांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने हा महसूल मिळाला आहे. अनेक वर्षे रिकामी असलेली ही घरे विक्रीसाठी विशेष मोहिमेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळाकडे तब्बल 5376 घरे विक्रीअभावी तशीच पडून होती तर त्यापैकी ३७६८ घरांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीमुळे म्हाडाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
मोठ्या प्रमाणात विक्री कशी झाली?
साधारण 2014 साली उभारण्यात आलेल्या 1410 घरांपैकी 1765 घरांची विक्री झाली आहे. तसेच 2014 ते 2020 दरम्यान उभारलेल्या 1669 घरांपैकी 692 घरे विकली गेली आहेत. यात विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांतच सुमारे 3570 घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
या विक्रीला गती देण्यासाठी कोकण मंडळाने विशेष मोहीम राबवली. घरांच्या किंमतीत सवलत देणे आणि खरेदीसाठी लवचिक अटी ठेवणे यामुळे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
