TRENDING:

Mumbai: लिफ्टमध्ये 3 जण आले, तरुणी आरशात पाहत होती अन् 3 सेकंदात स्फोट, मुंबईतला भयानक VIDEO

Last Updated:

सजावट करणारा एक तरुण हायड्रोजनने भरलेले फुगे घेऊन जाण्यासाठी लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये आल्यानंतर अवघ्या काही सेकंदात अचानक फुग्यांचा भीषण असा स्फोट झाला. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगावमध्ये एका  इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात २ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागात अनमोल टॉवर नावाची इमारत आहे. या इमारतीत वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे सजावटीचं काम सुरू होतं.  लिफ्टमधून एक महिला जात होती. त्यावेळी सजावट करणारा एक तरुण हायड्रोजनने भरलेले फुगे घेऊन जाण्यासाठी लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये आल्यानंतर अवघ्या काही सेकंदात अचानक फुग्यांचा भीषण असा स्फोट झाला.

advertisement

हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळाने लिफ्ट व्यापून गेली होती. सुदैवाने लिफ्टचं दार बंद झालं नव्हतं, त्यामुळे लिफ्टमधील तिघा जणांनी बाहेर पळ काढला. हा सगळा प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  सुदैवाने वेळीच लिफ्टमधील तिघेजण बाहेर पडले. पण, या आगीत तिघेही होरपळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: लिफ्टमध्ये 3 जण आले, तरुणी आरशात पाहत होती अन् 3 सेकंदात स्फोट, मुंबईतला भयानक VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल