मुंबई : लहान बाळांना सतत विविध आजार विळखा घालत असतात. असाच एक आजार म्हणजे ऑटिज्म होय. ऑटिज्म हे बाळाच्या विकासाशी निगडीत एक अपंगत्व आहे. अनेक लहान मुलांची वागणुक साधारण नसते आणि ही मुलं इतर मुलांपेक्षा असामान्य वाटतात. पण ऑटिज्मचे कोणतेही एक कारण नाही, जे बाळाच्या सामाजिक, कम्युनिकेशन आणि बिहेवरियल स्किल्सवर प्रभाव टाकते. म्हणून आज आपण याच आजाराबद्दल सर्व काही उपचार कशा पद्धतीने करतात येतात, हे जाणून घेऊयात.
advertisement
याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने डॉ. साक्षी गुजर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या आजाराबाबत संपूर्ण माहिती दिली.
या बाळांमध्ये ऑटिज्मचे संकेत -
लोकल18 शी बोलताना डॉ. साक्षी गुजर यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर 160 बाळांपैकी एकाला ऑटिज्म आजार होतो. ऑटिज्मचे कोणतेही एक कारण नाही आणि असे म्हटले जाते की पर्यावरणीय आणि जेनेटिक कारणांच्या एकत्रित प्रभावामुळे हा आजार उद्भवतो. सहसा दोन किंवा तीन वर्षांच्या बाळांमध्ये ऑटिज्मचे संकेत दिसून येतात.
यावेळी अक्षय तृतीयेला दुर्मिळ योग, या 3 राशीच्या लोकांचं नशिब उजळणार, तुमची रास यात आहे का?
ऑटिज्मवर कोणताही उपाय नाही. मात्र, याची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रभावशाली पद्धती उपलब्ध आहेत. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत ऑटिज्मचे संकेत मिळायला सुरुवात होते. अधिक स्पष्ट लक्षणे ही दोन किंवा तीन वर्षे वयामध्ये दिसू लागतात. ऑटिज्म तीन गोष्टींवर प्रभाव टाकते. सोशल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि बिहेवियर स्किल्स.
मेहनतीचं फळ! फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला तब्बल इतकी कोटींची कमाई
ऑटिज्मने ग्रस्त असणाऱ्या तीन वर्षांच्या मुलांमध्ये सोशल स्किल्सची कमतरता दिसून येते. यात बाळ आपले नाव ऐकल्यावर सुद्धा प्रतिक्रिया देत नाही. नजरेला नजर देऊन बोलत नाही. आपल्या गोष्टी इतरांशी शेअर करत नाही. एकटाच खेळतो, दुसऱ्यांशी बोलायला त्याला आवडत नाही. शारीरिक स्पर्शापासून दूर पाळतो. चेहऱ्यावर चित्र विचित्र हावभाव असतात आणि आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. अश्या वेळी त्यांना योग्य ती काळजी आणि थेरेपीची गरज असते.
Disclaimer : ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारीत आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.