प्रियकराच्या एका स्तुतीमुळे पेटली प्रियसी
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापूर्वी पीडितेची ओळख ही आरोपी आणि तिच्या मित्राशी झाली होती. ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण या तरुणीचा मित्र इस्टाग्रामवरुन पीडितेशी संवाद साधत होता. या बोलण्यात त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे असे मित्राने सांगितल्याने त्याच्या प्रेयसीच्या मनात संशय निर्माण झाला आणि तिच्या रागाचा पाराही वाढला. नंतर ती 7 मार्च रोजी पीडितेच्या घरी गेली आणि तिचा मोबाईल तपासला. मात्र त्यावेळी तिला काहीही आक्षेपार्ह मिळाले नव्हते.
advertisement
दरवाजा उघडला अन् घात झाला
7 मार्च रोजी पीडीतेचा मोबाईल चेक केल्यानंतर तरुणी परत गेली आणि ते परत 25 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या दोन मैत्रिणींसह पीडितेच्या या वर्सोवा येथील घरी गेली. त्यानंतर ओरापी तरुणीने घराची बेल वाजवली पण मध्यरात्री आईस्क्रीम डिलिव्हरी आली असावी,असे पीडितेला वाटल्याने दरवाजा उघडला. पण तेव्हाच आरोपी तरुणीने तिला बाहेर ओढून तिचे केप कापण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे ओरीपसह आलेल्या तरुणईंनी मोबाईलवर सर्व प्रकार कैद केला.
प्रियकराने दुसऱ्या तरुणींच्या केसांची केलेल्या स्तुतीचा राग एवढा ओरीपी तरुणींच्या मनात होता तीने पीडितेचे केस कापल्यानंतर 'हेअर नो हेअर'असे म्हणते सर्व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमी दिली आणि काही केस सोबत घेऊन निघून गेली. घटनेदरम्यान पीडित तरुणईने आरडाओरडा ही केला होता पण आरोपी आणि तिच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन सर्व प्रकार केलेला आहे.
घटनेनंतर 20 वर्षीय तरुणीने वर्सोवा पोलिसांकडे धावत घेत आरोपी तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. प्रियकर आणि पीडित तरुणी यांच्यात संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत सांगितले आहे.
