विश्वासाचा फायदा घेत कर्मचाऱ्याचा उद्योग
कामोठे सेक्टर 10 येथे असलेल्या एका दुकानाचे मालक हरीश वैध आहेत. त्यांच्या दुकानात संदीप सरोज हा कर्मचारी म्हणून काम करत होता. दुकानातील कॅश काऊंटर आणि बिलिंग सिस्टमची जबाबदारी त्याच्याकडे असल्याचा फायदा घेत त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे.
दुकानातील युजर आयडी सुरू असताना त्याचा वापर दुसऱ्या व्यक्तीने केल्याचे समोर आल्यानंतर मालकांना संशय आला. यानंतर बिलिंग सिस्टीमची तपासणी केली असता युजर आयडी आणि पासवर्डचा चुकीचा वापर करून अनेक बिले डिलीट करण्यात आल्याचे आढळून आले.
advertisement
दुकान मालकाचा संशय जास्त वाढल्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संदीप सरोज हा कॅश काऊंटरवर उभा राहून ग्राहकांकडून बिलाचे पैसे कॅश स्वरूपात स्वीकारताना दिसून आला. त्याने ही रक्कम एका पुडीत बांधून खिशात ठेवत असल्याचे स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसून आले आहे.
कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तपासादरम्यान एकूण 1 लाख 93 हजार 80 रुपयांची बिले डिलीट करून ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. हरीश वैध यांनी याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूकची गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
