मुल्की स्थानकाजवळ पॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20646) मंगळुरू सेंट्रल ते मडगाव या मार्गावर 30 मिनिटे उशिराने धावेल. तसेच, मडगाव-मंगळुरू सेंट्रल मेमू (गाडी क्रमांक 10107) ही गाडी सुमारे 20 मिनिटे उशिराने पोहोचेल. कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुण्याचे पाणी 25 फेब्रुवारीपासून बंद होणार? जलसंपदा विभागाचा इशारा, पण कारण काय?
advertisement
मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे फलाट क्रमांक 12 आणि 13 विस्तारीकरणाच्या कामांमुळे काही गाड्यांचे अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहावं लागणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
- 1. मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (12134) ही गाडी फक्त ठाण्यापर्यंतच धावेल, आणि ठाणे-सीएसएमटी दरम्यानची सेवा 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द राहील.
- मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (22120) आणि मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (12052) या दोन्ही गाड्या फक्त दादरपर्यंत धावतील, आणि दादर-सीएसएमटी सेवा 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द राहील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन प्रवासाची पूर्वतयारी करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी अधिकृत रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.