advertisement

BREAKING: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर सोपवली दोन मोठ्या जबाबदाऱ्या

Last Updated:

Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपवणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर सोपवणार दोन मोठ्या जबाबदाऱ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर सोपवणार दोन मोठ्या जबाबदाऱ्या
मुंबई: राज्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे समजते. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा सोपवण्यात आली आहे.

पुणे आणि बीडसाठी पवारांची पॉवर...

अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद होते. त्यांच्या पश्चात या जिल्ह्यांतील विकासकामे आणि राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनाच पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने, त्यांच्याकडे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
advertisement

आजच अधिकृत आदेश

प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज दुपारी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला. पुणे आणि बीडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली. तर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी घडल्या. अजितदादांच्या पश्चात खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधीमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडील अर्थ आणि नियोजन खाते वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. अर्थसंकल्पानंतर हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तूर्तास या खात्याचा भार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर सोपवली दोन मोठ्या जबाबदाऱ्या
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement