advertisement

BBM 6 : 'बाल्कनी'त अर्धवट राहिलेली ती खास चर्चा, करणला शेवटच्या क्षणी काय सांगणार होती प्राजक्ता? बाहेर येताच सगळं सांगितलं

Last Updated:

करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांची बिग बॉस मराठी 6 मध्ये चांगली मैत्री होती. करण घराबाहेर येण्याआधी प्राजक्ता त्याला काही तरी सांगणार होती असं करणनं बाहेर येऊन सांगितलं. ते काय होतं याचा खुलासा अखेर प्राजक्ताने केला.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून आतापर्यंत अनेक स्पर्धक घराबाहेर गेले. त्यातील एक म्हणजे करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे. दोघांची घरात खूप चांगली मैत्री होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय असं अनेकदा वाटत होतं. पण घराबाहेर आल्यानंतर दोघांनीही स्पष्टीकरण देत ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगितलं.
दरम्यान करण सोनावणे घराबाहेर आला तेव्हा त्याने मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की प्राजक्ता मला काही तरी सांगणार होती पण आमचं बोलणं होऊ शकलं नाही. प्राजक्ता करणला नेमकं काय सांगणार होती? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
advertisement
करणला प्राजक्तासोबतच्या नात्याबद्दल विचारला असता तो म्हणाला होता की, "आमच्या नात्याला माझ्याकडून तरी कन्फर्म मैत्रीचं नाव आहे. पण मी फक्त माझी बाजू मांडणार असी करणार नाही. तिची बाजू मांडणं देखील गरजेचं आहे."
"शेवटच्या दिवशी भाऊच्या धक्क्याचं शूट सुरू होतं आणि त्यानंतर ती मला काही तरी बोलणार होती. पण ते अपूर्ण राहिलं. कारण आमचं ठरलं होतं की हे सगळं झाल्यानंतर आपण बाल्कनीमध्ये जाऊ मला तुला काही तरी सांगायचं आहे. आम्ही सगळे कॉन्फिडन्ट होतो की मी नाही जाणार. ती मला काही तरी बोलणार होती."
advertisement
याविषयी अल्ट्रा मराठीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली, "मी त्याला सांगणार होते की, जरा नीट बोल, नीट राहा. कारण मला थोडंसं मला डाऊट होता त्यांच्या प्रश्नांवरून, त्यांनी आम्हाला डान्स करायला लावला. तेव्हा मी भाऊंना म्हणाले, याच्याबरोबर डान्स करू."
"माझ्या डोक्यात नेहमीच क्लॅरिटी होती. पण तिकडून असं दिसत होतं, भाऊंकडून आणि त्या प्रश्नांमधून. म्हणून ती क्लॅरिटी आणण्यासाठी.. मला त्याला सांगायचं होतं की आपल्याला क्लॅरिटी द्यायची आहे की आपण फ्रेंड्स आहोत. उगाच दुसरे अँगल्स नको. मला त्याला सीरियसली सांगायचं होतं की, ऐक मला तुला काही सांगायचं आहे. पण ते सांगायचा स्कोपच मिळाला नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : 'बाल्कनी'त अर्धवट राहिलेली ती खास चर्चा, करणला शेवटच्या क्षणी काय सांगणार होती प्राजक्ता? बाहेर येताच सगळं सांगितलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement