TRENDING:

Mumbai Shocking Accident : एक चूक अन् जेट्टीवरून टॅक्सी थेट समुद्रात, पुढं जे घढलं भयंकर...

Last Updated:

Mumbai Shocking Accident News : भाऊचा धक्का येथे बांधकाम सुरू असलेल्या जेट्टीवरून टॅक्सी समुद्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. स्थानिक मच्छीमारांनी त्यांना बाहेर काढले.परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का परिसरात गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या नव्या जेट्टीवरून एका टॅक्सी चुकून पुढे गेल्याने ती कार समुद्रात कोसळल्याची ही धक्कादायक घटना आहे. या अपघातात टॅक्सी चालक जयप्रकाश शर्मा (वय 61) यांचा मृत्यू झाला असून यलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
Mumbai Shocking Accident
Mumbai Shocking Accident
advertisement

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार मृत टॅक्सी चालकाचे नाव जयप्रकाश शर्मा होते. जेव्हा घटना घडली त्या रात्री ते टॅक्सीत एकटेच प्रवास करत होते. परिसरात अंधार असल्याने आणि त्यातही जेट्टीचे बांधकाम अद्याप पूर्ण नसल्यामुळे त्यांनी रस्ता चुकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  चुकून त्यांनी नव्या जेट्टीवर टॅक्सी नेली. बांधकाम अपूर्ण असल्याने त्यांची टॅक्सी समुद्रात कोसळली.

advertisement

टॅक्सी पाण्यात पडताच आसपास उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छीमारांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ समुद्रात उडी घेत बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनी शर्मा यांना बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आलं. त्यानंतर त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लेकांना मोठं केलं, त्यांनीच घराबाहेर काढलं, 75 वर्षीय आजोबांनी अशी घडवली अद्दल
सर्व पहा

दुर्दैवी पद्धतीने झालेल्या या अपघातामुळे स्थानिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Shocking Accident : एक चूक अन् जेट्टीवरून टॅक्सी थेट समुद्रात, पुढं जे घढलं भयंकर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल