कोणता निर्णय झाला?
मुंबई शहरात प्रवास करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणा लोकल किंवा मेट्रोचा वापर करत असतात. मात्र आता मुंबई मेट्रो 3 या भुयारी मार्गिकेच्या सर्व 27 स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेरील परिसरातील पार्किंगवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र हा निर्णय वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या सोयासाठी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुयारी मेट्रो मार्गिका आरे ते कफ परेड अशी पूर्ण सुरु झालेली आहे. या मार्गिकेवर सध्या 27 स्थानके आहेत त्यामुळे दररोज येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि या प्रवशांना मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीमुळे अडथळा होतो. अनधिकृत पार्किंगवर बंदी घातल्याने आता भोवतालच्या परिसरातील होणारी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 11:05 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मेट्रोने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच; प्रवाशांना सहन करावा लागणार 'हा' मोठा बदल
