रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल लाईनवर रेल्वेवर शनिवारी (16 ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पहाटेपर्यंत सुरू राहिल. सेंट्रल लाईनवर रविवारी दिवसभर कोणताही ब्लॉक नसेल. पण, वेस्टर्न लाईनवर रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.
advertisement
सेंट्रल लाईनवर ब्लॉक कधी आणि कुठे
सेंट्रल लाईनवर विद्याविहार ते ठाणे या मार्गांच्या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांपासून ते रविवारी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस, अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे 14 ते 20 मिनिटे उशीराने धावणार आहेत. याशिवाय, कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गाशी संबंधित तानशेत रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर 12 वाजून 30 मिनिटांपासून ते रविवारी पहाटे 5 वाजून 5 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल.
वेस्टर्न लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
वेस्टर्न लाईनवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच काही लोकल रद्द होणार आहेत. काही लोकल 20 मिनिटे उशीराने धावणार आहेत. अंधेरी-बोरिवली लोकल गाड्या हार्बरमार्गे गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.