Pune Station: पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय मिळाला! या ठिकाणी नवीन टर्मिनलचं काम सुरू, कधी होणार उद्घाटन?

Last Updated:

Pune Station: पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड वर्दळ असते. भविष्यात प्रवाशांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय शोधला गेला आहे.

Pune Station: पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय मिळाला! या ठिकाणी नवीन टर्मिनलचं काम सुरू, कधी होणार उद्घाटन?
Pune Station: पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय मिळाला! या ठिकाणी नवीन टर्मिनलचं काम सुरू, कधी होणार उद्घाटन?
पुणे: देशातील महत्त्वाच्या शैक्षणिक, ऐतिहासिक आणि औद्योगिक शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. याठिकाणी भारतभरातून विद्यार्थी आणि प्रवाशांची ये-जा सुरू असते. लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड वर्दळ असते. भविष्यात प्रवाशांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय शोधला गेला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी हडपसर येथे एक नवीन रेल्वे टर्मिनल सुरू होणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे टर्मिनलचं काम सुरू आहे. 'अमृत भारत स्टेशन योजने' अंतर्गत हे टर्मिनल उभारलं जात असून त्यासाठी सुमारे 135 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. या टर्मिनलच्या निर्मितीमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील गाड्यांचा आणि प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल. या टर्मिनलचे काम डिसेंबर 2025 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला याठिकाणाहून हरंगुळ एक्सप्रेससह 8 नवीन गाड्या सुरू करण्याचं नियोजन आहे.
advertisement
अत्याधुनिक सुविधा
हडपसर टर्मिनलवरील अप आणि डाउन प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता याठिकाणी 24 डब्यांच्या गाड्यांनाही थांबा घेता येईल. या प्रकल्पात जुन्या मालवाहतूक मार्गांचं रूपांतर, एक नवीन मालवाहतूक कॉरिडॉर, आधुनिक सोयीसुविधा असलेली स्टेशन इमारत, सर्क्युलेटिंग क्षेत्र, पार्किंगची सुविधा आणि इतर यंत्रणा उभारण्यात येत आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसर टर्मिनलवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 चं काम पूर्ण झालं आहे. लवकरच एक लिफ्ट, एस्कलेटर, 12 मीटर रुंदीचा फूटओव्हर ब्रिज, रूफ प्लाझा आणि निवासगृह अशा सुविधाही उपलब्ध होणार आहेत. हे टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर हडपसर स्टेशनमधून प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. परिमाणी पुणे शहरातील रेल्वे वाहतुकीचा विस्तार होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Station: पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय मिळाला! या ठिकाणी नवीन टर्मिनलचं काम सुरू, कधी होणार उद्घाटन?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement