अंजली दमानिया शूर्पणखा, त्यांचं नाक कापावं लागेल, जयंत पाटलांनी बायका पोरांना.... रुपाली ठोंबरे संतापल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शेकाप नेते जयंत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी लगोलग राज्याची उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. मात्र अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांकडून शपथविधीची घाई केली म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तरे देण्याची मालिका सुरू आहे. शेकाप नेते जयंत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अंजली दमानिया शूर्पणखा, त्यांचं नाक कापावं लागेल
अंजली दमानिया स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या समजतात. एका बाईचं कुंकू पुसले गेले की दुसऱ्या बाईला जास्त समजते कारण त्या महिला असतात. परंतु अंजली दमानिया शूर्पणखा आहेत. आम्हाला अंजली दमानिया यांचे नाक कापावे लागणार आहे, कारण सध्या त्या त्याच भूमिकेत आहेत, अशी घणाघाती टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
advertisement
एक स्त्री म्हणून अंजली दमानिया यांना संवेदना आणि दुःख समजायला हवे होते. नेहमीप्रमाणे सुपारी घेऊन प्रकरण वाजवण्याची सवय अंजली दमानिया यांची जात नाही. मात्र आम्ही आता सहन करणार नाहीत लक्षात ठेवा, असा इशाराही रुपाली ठोंबरे यांनी दिला.
जयंत पाटलांनी बायका पोरांना सल्ला द्यावा
शपथविधीसाठी घाई केली, असे शेकाप नेते जयंत पाटील यांचे म्हणणे आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, ताराराणीसाहेब, झाशीची राणी यांच्या महाराष्ट्रात जयंत पाटील साहेब असे बोलणार असतील तर त्यांना माझा एक फुकटमध्ये सल्ला आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या बायकांना आणि पोरांना एक नियमावली लिहून द्या की तुम्ही मेले की १० दिवस किंवा वर्षभर कुठले कार्य करायचे नाही, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. सुनेत्रा वहिनींबद्दल बोलायचा अधिकार तुम्हाला नाही, असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
advertisement
जयंत पाटील यांचे वक्तव्य गुळसट आहे. जयंत पाटील आता शून्य झाले आहेत. जयंत पाटील यांच्या सल्ल्याची महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील महिलांना आता गरज नाही आणि त्यांची तेवढी पात्रता देखील नाही. जयंत पाटलांनी आपली मळमळ ओकू नये, असे त्या म्हणाल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 3:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंजली दमानिया शूर्पणखा, त्यांचं नाक कापावं लागेल, जयंत पाटलांनी बायका पोरांना.... रुपाली ठोंबरे संतापल्या








