TRENDING:

Dadar Kabutarkhana: मुंबईत मध्यरात्री आलं पालिकेचं पथक, पण जमाव ऐकेना, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Dadar Kabutarkhana: नागरिकांना होणारा आरोग्याचा धोका आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे दादरचा कबुतरखाना बंद करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेककडून थेट कारवाई करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दादर परिसरातील कबुतरखाना अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र, आता हा कबुतरखाना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री महानगरपालिकेचं एक पथक संबंधित स्थळी दाखलं झालं होतं. मात्र, या पथकाच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
advertisement

दादर रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या या कबुतरखान्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. येणारे-जाणारे लोक कबुतरांना खाद्य टाकतात. हे खाद्य आणि कबुतरांची विष्ठा यामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरते. याशिवाय, अलीकडच्या काळात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून हा कबुतरखाना हटवण्याची मागणी होत होती. सार्वजनिक आरोग्याचा व वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांचे काही गट पुढे आले आहेत.

advertisement

मुंबई: आरेतील आदिवासींचं अस्तित्व धोक्यात, प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नोटीसा

शुक्रवारी रात्री महापालिकेचं पथक कबुतरखाना हटवण्यासाठी गेलं होतं. या पथकाने कबुतरखान्यातील पत्रे, पिंजरे आणि इतर साहित्य हटवण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळातच स्थानिकांनी विरोध करत घोषणाबाजी केली आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

advertisement

महापालिकेच्या पथकाने कबुतरखान्यातील काही गोष्टी हटवल्या आहेत. मात्र, संपूर्ण कबुतरखाना तोडण्यात आलेला नाही. सध्या तिथे एक पिंजरा शिल्लक आहे. आता महापालिकेची पुढील कारवाई कधी होणार आणि ती कोणत्या पद्धतीने पार पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Dadar Kabutarkhana: मुंबईत मध्यरात्री आलं पालिकेचं पथक, पण जमाव ऐकेना, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल