125 वर्षे जुना एल्फिस्टन पूल गेल्या वर्षीच इतिहास जमा झाला असून त्याचा सांगाडा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. या विशेष कामासाठीच सोमवारी मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. एल्फिन्स्टन ब्रिजच्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे (ROB) पॅनेल काढण्यासाठी सोमवारी मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील परळ ते करी रोड या स्थानकादरम्यान, विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करणार आहे. या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवांवर रात्री उशिरा परिणाम होणार आहे.
advertisement
रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक, 30 मार्च रोजी रात्री 23:40 पासून ते 31 मार्च रोजी पहाटे 03:40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत, भायखळा आणि दादर या दोन्हीही स्थानकांवर स्लो- फास्ट आणि अप- डाऊन दोन्हीही मार्गांवर यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवा रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या मर्यादित स्थानकांपर्यंत चालतील तर, काही लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार आहे. ज्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे.
परिणाम होईल.
कोणकोणत्या लोकल रद्द होणार?
1. रात्री 11:23, 11:34, 11:58 आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.05 वाजता सीएसएमटीवरून कुर्लासाठी सुटणारी लोकल 30 मार्चच्या रात्री आणि 31 मार्चच्या मध्यरात्रीची लोकल रद्द होणार आहे.
2. मध्यरात्री 12.02 वाजता सीएसएमटीवरून अंबरनाथसाठी रवाना होणारी लोकल 31 मार्च रोजी रद्द होणार आहे.
3. रात्री 10.15 वाजता अंबरनाथवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल 30 मार्च रोजी रद्द होणार आहे.
4. पहाटे 04.04 वाजता ठाण्यावरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल 31 मार्च रोजी रद्द होणार आहे.
कुर्ल्यापर्यंत कोणकोणत्या लोकल धावणार?
1) रात्री 10.00 आणि 10.18 वाजता डोंबिवलीवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
2) रात्री 10.26 वाजता कल्याणवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
3) रात्री 10.15 वाजता खोपोलीवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
4) रात्री 10.40 वाजता बदलापूरवरून परळसाठी रवाना होणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
ठाणे आणि दादर पर्यंत कोणकोणत्या लोकल धावणार?
1) रात्री 09.59 वाजता कल्याणवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
2) रात्री 10.00 वाजता कसाऱ्यावरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल दादर स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
3) रात्री 11.29 वाजता बदलापूरवरून सीएसएमटीसाठी रवाना होणारी लोकल दादर स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.
4) तर, सीएसएमटीवरून कर्जतसाठी 31 मार्च रोजी, मध्यरात्री 12.12 वाजता धावणारी लोकल सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरून 12:30 वाजता सुटेल.
30 मार्च रोजी 11:30 ते 31 मार्च रोजी 12:08 वाजेपर्यंत सीएसएमटी (CSMT) वरून सुटणाऱ्या डाउन स्लो ट्रेन्स भायखळा आणि दादर दरम्यान डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या लोकल चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर थांबणार नाहीत. दादरनंतर पुन्हा माटुंगा स्टेशनपासून त्या लोकल पुन्हा स्लो लाईनवर वळवण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना त्यांच्या रात्रीच्या उशिराच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे, कारण ब्लॉक कालावधीत सेंट्रल लाईनवरील सेवांवर लक्षणीय परिणाम होईल.
