लॉकडाउननंतरचा कठीण काळ जितेंद्र यांनी स्वयंपाककलेच्या जोरावर संधीमध्ये बदलला. कुक म्हणून असलेला अनुभव आणि चवीवरची पकड यामुळे त्यांनी घराजवळ गाडी लावून केवळ दहा रुपयांत वडापाव विकायला सुरुवात केली. स्थानिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच त्यांच्या पुढच्या पावलाची प्रेरणा ठरली. ग्राहकांच्या सूचनेनुसार त्यांनी आपल्या नॉनव्हेज खासियतचा उपयोग करून काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि मुंबई महाराष्ट्रातील पहिला बटर चिकन पाव सादर केला. हा प्रयोग लोकांना एवढा आवडला की काही दिवसांतच त्यांच्या गाडीपाशी रांगा लागायला लागल्या. याच यशाच्या जोरावर ‘फूड माफिया’ या नावाने त्यांनी स्वतःचा फूड स्टॉल सुरू केला.
advertisement
आज हा स्टॉल सहा वर्षांपासून तितक्याच लोकप्रियतेने चालतो आहे. या ह्याच व्यवसायातून ते आज महिन्याला ६० ते ७० हजार रुपये कमवतात. दर्जेदार चव, परवडणारा दर आणि मनमोकळी सेवा यामुळे नवीन ग्राहक जोडले जात आहेत तर जुन्या ग्राहकांची निष्ठा टिकून आहे. आज ‘फूड माफिया’मध्ये ६ ते ७ कर्मचारी काम करतात. “माझ्यामुळं इतरांना रोजगार मिळतोय, हीच सर्वात मोठी कमाई,” असे जितेंद्र अभिमानाने सांगतात. आपल्या व्यवसायाला मिळालेलं यश हे कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाल्याय. आईवडील आणि पत्नीने अडचणीच्या काळात दिलेली साथ ही त्यांची खरी ताकद ठरली. जिद्द, मेहनत आणि योग्य वेळेत घेतलेले निर्णय यांच्या बळावर जितेंद्र वाघेला यांनी एक छोट्या गाडीपासून ते आज एक लोकप्रिय खाद्य ब्रँडपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांचा संदेशही तितकाच प्रेरणादायी—“मेहनत केली तर यश नक्की मिळतं, आणि उद्योजकता हीच खरी प्रगतीची वाट आहे.” असे ते सांगतात.