नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता यश माने हे 19 ऑक्टोबर रोजी विरार जकात नाका परिसरात रात्री मिठाई वाटत होते. त्या वेळी काही लोक एका भटक्या तरुणाला हुसकावत होते. यश यांनी पुढाकार घेत त्या तरुणाला वाचवले आणि त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. काही दिवसांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि कर्नाटकातील एका छोट्या गावात पोहोचला.
advertisement
Success Story : अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी मशरूम शेती, महिन्याला इतकी कमाई
हरवलेला तरुण म्हणजे सलीम बंडी
व्हिडीओ पाहताच कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हागरीबोम्मनहल्ली गावातील खसीम बंडी यांना त्यात दिसणारा चेहरा फार ओळखीचा वाटला. नीट पाहिल्यावर ते थक्क झाले. कारण व्हिडिओतील तरुण दुसरा कोणी नसून त्यांचा मुलगा सलीम बंडी होता, जो दोन वर्षांपूर्वी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. घरच्यांनी त्याचा शोध घेतला, पोलिसांत तक्रार दाखल केली, पण त्याचा काहीच मागमूस लागला नाही. काळाच्या ओघात सर्वांनी गृहीत धरले की सलीम कदाचित या जगात नाही. मात्र, सोशल मीडियावरील त्या एका रीलने त्यांच्या आशा पुन्हा जागवल्या.
सोशल मीडियावरून जोडला पुन्हा धागा
खसीम यांनी इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि यश माने यांना आपल्या मुलाची माहिती दिली. यश यांनी त्यांना मुंबईत यायला सांगितले आणि तोपर्यंत सलीमची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. काही तासांच्या प्रवासानंतर खसीम आपल्या भावासह आणि गावकऱ्यांसह नालासोपारा येथे पोहोचले. मंगळवारी पहाटे पाच वाजता यश माने यांनी त्यांना विरार स्थानकातून घेऊन सलीम असलेल्या ठिकाणी नेले.
दोन वर्षांनंतर बाप-लेकांचा भावनिक मिलाफ
तिथे पोहोचताच खसीम यांची नजर आपल्या मुलावर पडली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दोन वर्षांनंतर आपल्या लेकाला पाहून त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी सलीमलाही वडिलांना ओळखल्याचा आनंद झाला आणि तोही मुलासारखा रडू लागला. या भावनिक पुनर्भेटीचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी यश माने यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे.






