advertisement

राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी, औपचारिक घोषणा बाकी!

Last Updated:

आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असून ही २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

News18
News18
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सूत्र हाती घेतली. उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतला आहे. आता सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असून ही २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली होती. मात्र, आज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे.  प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हातवर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची मााहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
२६ फेब्रुवारीला मुंबईत बैठक होईल
दरम्यान,  आज साप्ताहिक बैठक जी अजितदादा आयोजित करायचे ती आज वहिनी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. अर्थसंकल्पात विविध प्रकारची कामं यावर चर्चा झाली.  झालेल्या निवडणुका यावर चर्चा झाली. अजितदादांनी महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न केला तसेच पुढच्या काळात काम करणायचे आश्वासित केलं आहे. मागील २-३ दिवसात प्रशासकीय कामाची चुणूक दाखवली आहे बारामती मंत्रालयातील बैठका त्यांनी घेतल्या. दादा जसे सगळ्या गोष्टी हाताळायच्या तसंच वहिनी हाताळतील २३ तारखेला शोक सभा २६ तारखेला निवड प्रक्रिया घेऊन, २६ फेब्रुवारीला ही बैठक मुंबईत होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी, औपचारिक घोषणा बाकी!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement