TRENDING:

Mumbai CNG: मुंबईकरांसमोर नवं संकट,महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड, CNG चा पुरवठा थांबणार

Last Updated:

घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून (Mahanagar Gas Limited) गॅस पुरवठा खंडीत होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाला असून वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) चा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. महानगर गॅस लिमिटेड आपल्या घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना प्राधान्याने विनाखंड पुरवठा करत असतो. पण एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला वायू पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक गॅस पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे.

advertisement

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील  सीएनजी स्टेशन बंद होण्याची शक्यता

गॅस प्रोसेसिंगच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अनेक सीएनजी स्टेशन बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य परिवहन उपक्रमांमधील सीएनजी पुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील  सीएनजी स्टेशन बंद होण्याची शक्यता आहे.  बाधित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्यास सांगण्यात आले आहे.

advertisement

सार्वजनित वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

सीजीएस वडाळा येथील गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंप बंद होण्याची शक्यता आहे.  सीएनजी  पुरवठा स्थिर होईपर्यंत टॅक्सी, ऑटो, बेस्ट बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai CNG: मुंबईकरांसमोर नवं संकट,महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड, CNG चा पुरवठा थांबणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल