महायुतीचं राज्यपाल नियुक्त जागांचं ठरलं? सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार महायुती लवकरच यासंदर्भातील यादी राज्यपालांकडे सूपूर्द करणार आहे. भाजपाचे विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन्हीकडे संख्याबळ अधिक आहे. अशा परिस्थितीत महायुतीमध्ये या जागांसाठी भाजपाचा वरचष्मा राहणार हे स्पष्ट आहे. तर या दरम्यानच्या काळात विधानपरिदेच्या अध्यक्षांची देखील निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपाचे सर्वाधिक संख्याबळ असल्याने भाजपाकडून प्रविण दरेकर आणि राम शिंदे यांच्या नावाची विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर याचसंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे.
advertisement
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकवेळा यादी मिळूनही या जागा अडवून धरल्या होत्या. दुसरीकडे विधानपरिषदेच्या कार्यकाल संपणाऱ्या 11 जागांसाठी देखील निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी 27 जुलै रोजी मतदान देखील पार पडणार आहे. दुसरीकडे पक्षात कोणीही नाराज न राहता विधानसभेला सामोर जायचं असेल तर ही वेळ भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या काळात देवेंद्र फडणवीस नेमका कोणता राजकीय डाव खेळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत महायुती प्रत्येक पाऊल योजनेनीशी उचलताना दिसत आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये इच्छुकांची मन सांभाळताना देखील पक्ष नेतृत्त्वाची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.
