TRENDING:

खबर पक्की, धाड टाकली! हिंजवडीत टिप मिळताच पोलिसांचा छापा; 52 मोबाईल ,7 लॅपटॉप, 99 कार्ड अन्...

Last Updated:

सुमारे 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

नवी मुंबई : डोंबिवली आणि पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे नवी मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूक रॅकेटवर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.  महत्त्वाचे म्हणजे आरोपींकडून अनेक महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

52 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 99 डेबिट कार्ड, 64 बँकांची पासबुक आणि टाटा सफारीसह अनेक महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी ब्रांच ऑफिस प्रमाणे कार्यरत असल्याचं समोर आलं आहे. या शाखांमधून ऑनलाईन गेमिंग आणि इतर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम पुढील स्तरांवर पाठवली जात होती.

advertisement

83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक

तपासादरम्यान पोलिसांना एकूण 886 बँक खाती सापडली असून, ती गोठवण्यात आली आहेत. राष्ट्रीय एनसीसीआरपी पोर्टलवरील 393 तक्रारींमधूनच ही खाती संबंधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तक्रारींमधून सुमारे 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

advertisement

12 आरोपींना अटक

आतापर्यंत या प्रकरणात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी एकाच वयोगटातील असून, बहुतांश महाराष्ट्राबाहेरील आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विविध बँक खाती तयार करून, त्या खात्यांद्वारे पैसे पुढे पाठवण्याचं काम केल्याचं तपासात उघड झालं आहे.

मोठं रॅकेट असल्याची शक्यता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास? आहारात समावेश करा मेथीचे लाडू, अनेक होतील फायदे
सर्व पहा

यामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे की त्यांनी आपली बँक खाती किंवा सिम कार्ड कोणासोबतही शेअर करू नये. कारण या माहितीचा गैरवापर सायबर गुन्हेगारीसाठी केला जाऊ शकतो. तसेच, फसवणुकीची घटना घडल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक झाल्यानंतरच्या पहिल्या तासात, म्हणजेच 'गोल्डन अवर'मध्ये तक्रार केल्यास जास्तीत जास्त रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
खबर पक्की, धाड टाकली! हिंजवडीत टिप मिळताच पोलिसांचा छापा; 52 मोबाईल ,7 लॅपटॉप, 99 कार्ड अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल