प्रवास होणार अधिक वेगवान
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार एकूण 28 गाड्यांचा सरासरी वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दररोज सुमारे 157 मिनिटांची वेळ बचत होणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार असून प्रवास अधिक जलद आणि वेळेत पूर्ण होईल. काही प्रमुख गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेळ कमी करण्यात आला आहे. हरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये 24 मिनिटांची वेळ वाचणार असून वांद्रे टर्मिनस-उदयपूर एक्स्प्रेसच्या प्रवासाच्या वेळेत 10 मिनिटांची बचत करण्यात आली आहे.
advertisement
तसेच अप दिशेतील सात गाड्या आता 2 ते 5 मिनिटे लवकर सुटणार आहेत तर डाउन दिशेतील नऊ गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत 5 ते 30 मिनिटांपर्यंत बदल करण्यात आला आहे. हे बदल गाड्यांची क्षमता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांना होणारे फायदे?
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा, काही ठिकाणच्या वेगमर्यादा हटवणे आणि क्रॉस सेक्शन कमी करणे अशा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. काही गाड्यांना नवे थांबे देण्यात आल्याने लेटमार्कचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.या नव्या वेळापत्रकामुळे गाड्या अधिक वेळेवर, जलद आणि आरामदायी होतील. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे.
