TRENDING:

मराठी भाषा दिन : ...आणि फाडफाड इंग्रजी बोलणारे 'मला मराठी शिकव ना' म्हणू लागले!

Last Updated:

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायचं असेल तर मराठीचं मूळ ज्ञान असायला नको का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शालेय शिक्षण मातृभाषेतून झालं आणि महाविद्यालयात अचानक फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींचा सामना करावा लागला की, मनात संवादाबाबत भीती निर्माण होते. त्यातून वेगवेगळे न्यूनगंड तयार होतात, आत्मविश्वास खालावतो. परंतु त्यातूनच एक चांगली गोष्ट अशी घडते की, आपण इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. ती कितीही कठीण असली, तरी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जायचं असेल तर तिचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मीसुद्धा इंग्रजी शिकण्यासाठी बरीच धडपड केली, अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकं वाचली, इंग्रजी गाणी ऐकली, चित्रपट वाचले, इत्यादी, इत्यादी...पण मनात कुठेतरी आपली मातृभाषा मागे पडतेय याची खंत होतीच.
मी ठरवलं, आपलं पुढचं सादरीकरण मराठीतच व्हायला हवं!
मी ठरवलं, आपलं पुढचं सादरीकरण मराठीतच व्हायला हवं!
advertisement

२०२० वर्षातला डिसेंबर महिना होता तो. चर्चगेटच्या के. सी. महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा आणि मुलाखत पार करून मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या कोर्समध्ये मी प्रवेश मिळवला. शाळेत असताना परिसरातल्या विद्यार्थ्यांसोबत, महाविद्यालयात असताना मुंबईतल्या विद्यार्थ्यांसोबत वावरणारी मी आता देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य स्वप्न ऊराशी बाळगून स्वप्ननगरीत आलेल्या अत्यंत हुशार  विद्यार्थ्यांसोबत एकाच वर्गात बसून शिकू लागले. मला जी काही इंग्रजी येत होती, ती अगदी साधी, सरळ, सोप्या शब्दांची होती पण वर्गातले इतर विद्यार्थी जे कठीण कठीण शब्द वापरायचे ते अगदी माझ्या डोक्यावरून जायचे. मग मात्र मी डिक्शनरी घेऊनच वर्गात बसू लागले.

advertisement

काही महिने लोटले, दररोज इंग्रजीतूनच संवाद साधावा लागायचा, त्यात वेळोवेळी सर्वांसमोर जाऊन वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण (Presentation) द्यावे लागायचे, त्यामुळे माझ्या इंग्रजीत आधीपेक्षा बरीच सुधारणा झाली. मग मी विचारात पडले, आपण इतर विद्यार्थ्यांकडून जर इंग्रजी शिकू शकतो, तर आपली भाषा त्यांना का नाही शिकवू शकत? मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायचं असेल तर मराठीचं मूळ ज्ञान असायला नको का? झालं, आता मी ठरवलं की, आपलं पुढचं सादरीकरण मराठीतच व्हायला हवं, कारण मला इंग्रजी येतं हे प्राध्यापकांना आतापर्यंत कळलं होतं. आता मला त्यांना आपल्याला नेमकं काय येतंय हे माझ्या भाषेत सांगायचं होतं. अगदी माझ्या मनासारखंच घडलं. खरंतर मी ते घडवून आणलं.

advertisement

Raj Thackeray : दोनच दिवसात मोठा निर्णय होणार, मराठी भाषा दिनी राज ठाकरेंची घोषणा

'आपले प्रादेशिक वर्तमानपत्र' या विषयावर मी सादरीकरण केलं. खरं सांगायचं तर मनात भीती होती, कोण काय म्हणेल, मला ओरडा तर पडणार नाही ना, याची. पण आपली मराठी भाषा इतकी सुरेख आहे की, ती कोणाली भावली नाही, रुचली नाही तर नवलंच. माझं सादरीकरण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. इतर विद्यार्थ्यांनी कौतुक केलं. काहीजणांनी तर माझ्या सादरीकरणाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केले. अनेकजण प्रामाणिकपणे असंही म्हणाले की, तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही पण या भाषेतला गोडवा जाणवला, तुझं मराठीवर किती प्रेम आहे हे ठळकपणे दिसलं. मग काय, के. सी. महाविद्यालयात मराठी मंडळसुद्धा आहे याची माहिती मला मिळाली आणि त्यांनी तिथे सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केलं.

advertisement

महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी या मंडळात सहभागी व्हावं यासाठी माझे सत्र आयोजित केले जाऊ लागले. विशेष म्हणजे त्यानंतर अनेक अमराठी विद्यार्थीसुद्धा मराठी मंडळात सहभागी झाले. 'आम्ही फक्त तुझ्यासाठी या मंडळात आलो', असं काहीजण येऊन मला सांगायचे. त्यापेक्षाही कौतुकाची बाब अशी की, 'आम्हाला तुझ्यासारखं मराठी बोलायला शिकव', अशी हक्काची मागणी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही भेटल्या. पुढे या मराठी मंडळाची सूत्रसंचालन विभागप्रमुख म्हणून माझी निवड झाली. मग स्पर्धेच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संपर्क येऊ लागला. तेव्हा कळलं मराठी भाषेचा गोडवा सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारी मी एकटी नव्हते, तर माझ्यासारखीच एक ईशा प्रत्येक महाविद्यालयात आहे आणि म्हणूनच तरुण पिढीला लाभलेल्या इंग्रजी भाषेच्या गराड्यात आपल्या मराठीचा ओलावा आजही दिमाखात टिकून आहे. सांगण्याचं उद्देश्य इतकंच की, आपली भाषा इतरांनी बोलावी यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणं आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात तेजी, तुरीने ओलांडला 9 हजाराचा टप्पा, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/मुंबई/
मराठी भाषा दिन : ...आणि फाडफाड इंग्रजी बोलणारे 'मला मराठी शिकव ना' म्हणू लागले!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल