TRENDING:

Marathi : 'तुम मराठी लोग गंदा...', घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद पेटला

Last Updated:

Marathi : घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी-गुजराती असा वाद उफाळून आला आहे. मराठी कुटुंबीयांना त्यांनी मांसाहार खाण्यावरून इमारतीमधील गुजराती-जैन यांनी अपमानास्पद टिप्पणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मागील काही महिन्यांपासून मुंबईत सातत्याने मराठी आणि अमराठी असा वाद सुरू आहे. मराठी भाषेचा, मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना मुंबई आणि परिसरात घडत आहे. घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी-गुजराती असा वाद उफाळून आला आहे. मराठी कुटुंबीयांना त्यांनी मांसाहार खाण्यावरून इमारतीमधील गुजराती-जैन यांनी अपमानास्पद टिप्पणी केली आहे.
News18
News18
advertisement

मागील काही वर्षांपासून मुंबई आणि परिसरात मराठी कुटुंबांना घरे नाकारण्याचा प्रकार घडत आहे. मराठी माणसाला डावलण्याच्या घटना घडत असून भाषेवरून अपमानास्पद म्हटले जाते. या घटनांवरुन संतापही व्यक्त करण्यात येत आहे. आता घाटकोपरमध्ये घडलेल्या एका घटनेने अमराठी लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

घाटकोपर येथील एका सोसायटीमध्ये बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. या 4 मराठी कुटुंबांना इतर कुटुंबीयांकडून मांसाहारी जेवणावरून गुजराती, जैन सदस्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. या सोसायटीमधील शाह नावाच्या व्यक्तीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो',असे वारंवार म्हटले.

advertisement

मनसैनिकांची धडक....

या घटनेची माहिती समजताच मनसैनिकांनी या सोसायटीमध्ये धडक दिली. यावेळी त्यांनी सोसायटीतील सदस्यांना इशारा दिला. या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंब आहेत. पण, त्यांना यापुढे त्रास दिला तर त्यांच्यासाठी 4000 लोक धावून येतील असेही त्यांनी म्हटले. मनसैनिक सोसायटीमध्ये पोहचले तेव्हा मराठी कुटुंबांचा अपमान करणारे शाह आणि इतर जण समोर आले नाहीत. तर, इतर रहिवाशांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मनसेचे राजू पार्टे यांनी पोस्ट शेअर करत घाटकोपरमधील वादाची पोस्ट शेअऱ केली आहे.

advertisement

ह्या घाटकोपर मध्ये आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, असा प्रश्न त्यांनी केला. तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. पुर्ण सोसायटी गुजराती फक्त 4 जण मराठी. रोजचा ह्यांचा त्रास मराठी माणसाला खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा अपमान करतात असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Marathi : 'तुम मराठी लोग गंदा...', घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद पेटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल