केडीएमसी क्षेत्रातील गणरायाच्या विसर्जनची माहिती आणि मार्ग एका क्लिक वर!
आज केव्हाही न थांबणाऱ्या मुंबईमध्ये माणुसकीचं दर्शन झालं. कायमच सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणाऱ्या ह्या पोलिसांनी एका प्रेग्नेंट महिलेला जीवनदान दिलं आहे. मुंबईच्या नायर रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी निघालेल्या फातुमा फैजुल्ला शेख या गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे ती वेळ न दवडता घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी निघालेल्या फातुमा शेखच्या सोबत कोणी होतं किंवा नाही ? याची माहिती नाही. प्रसूती कळा येत असल्यामुळे पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
advertisement
'ती'चा 'तो' झाला तर कुणी 'तो'चा 'ती'! स्पेशल 45 जणांचं पुणेरी ढोलपथक, PHOTOS
कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास, सीएसटीकडे जाणाऱ्या स्लो लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत असताना फातुमा यांना अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या नायर रुग्णालयात प्रसूतीसाठी जात होत्या. प्रसुतीसाठी निघालेल्या फातुमा यांना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे आणि त्यांची परिस्थिती गंभीर होत चालल्यामुळे त्यांनी घाटकोपर स्थानकात उतरण्याचा निर्णय घेतला. याच वेळी ड्युटीवर असलेल्या पोलिस हवालदार संभाजी जाधव, महिला होमगार्ड फिरदोस खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत रेल्वे हेल्पलाइनकडून तातडीचा संदेश मिळाला. माहिती मिळताच पोलिसांनी फातुमा शेख यांना राजावाडी रूग्णालयात दाखल केले.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा ओरिओ मोदक, लहान मुलं देखील आवडीने खातील
राजावाडी हॉस्पिटलमध्येच तिने बाळाला जन्म दिला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. सध्या ह्या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी आपल्या प्रसंगावधानामुळे सामान्य नागरिकांचे जीव वाचवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फातुमा ह्या मुळच्या टिटवाळ्याच्या रहिवासी असून तिच्या पतीने रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत. फातुमा शेखने सोमवारी रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.