Ganeshotsav 2025: 'ती'चा 'तो' झाला तर कुणी 'तो'चा 'ती'! स्पेशल 45 जणांचं पुणेरी ढोलपथक, PHOTOS

Last Updated:
हे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे. समाजाच्या रूढीमान्य चौकटी मोडून या पथकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1/7
आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली ढोल-ताशाची परंपरा गणेशोत्सवात जपली जाते. मात्र, या परंपरेत समाजाच्या सर्व घटकांना स्थान मिळालं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत आणि इतिहास घडवत, 2024 साली पुण्यात जन्माला आलं शिखंडी ढोल ताशा पथक. भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक. या पथकाच्या प्रवासाबद्दल मनस्वी गोईलकर यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

advertisement
2/7
महाभारतातील शूर योद्धा शिखंडी यांच्या नावावरून या पथकाला नाव देण्यात आले आहे. रूढीमान्य चौकटी मोडून या पथकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक लोकांना तृतीयपंथीय व्यक्ती फक्त रस्त्यावर पैसे मागणारी वाटतात, पण ही कल्पना चुकीची आहे.

3/7
शिखंडी पथकाच्या माध्यमातून, या लोकांनी हे चुकीचे चित्र मोडीत काढून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, या पथकातील अनेक तृतीयपंथीय व्यक्ती नोकरीसुद्धा करतात. काही बँकेत काम करतात, काही छोट्या-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आहेत तर काहींचा स्वतःचा व्यवसाय आहे.

4/7
हे पथक समाजकार्यकर्त्या कदंबरी शेख यांच्या कल्पनेतून साकारले गेले आहे. मनस्वी गोईलकर, प्रवीण सोनवणे, प्रितेश कांबळे आणि मन्नत या मार्गदर्शकांच्या अथक प्रयत्नांमुळे या ढोल ताशा पथकाची स्थापना झाली. शिखंडी पथकाची सुरुवात 2024 साली पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळात झाली.

5/7
समाजातील दुर्लक्षित समुदायाला नवा मार्ग देण्याचं हे स्वप्न नादब्रह्म ढोल ताशा पथकाचे अतुल बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात उतरत आहे. तसेच पुनीत बालन ग्रुपने ढोल पुरवून पथकाला साथ दिली.

6/7
गेल्यावर्षी (2024 साली) शिखंडी पथकाने पुण्यातील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीला आपले पहिले वादनाचे सादरीकरण करून आपल्या पथकाची सुरुवात केली. पुण्याच्या मानाचा तिसरा गणपती तसेच गुरुजी तालीमच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर नवरात्रोत्सव, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि राजस्थानसह महाराष्ट्राबाहेरील कार्यक्रमांमध्येही पथकाने सादरीकरण केले आहे.

7/7
सध्या शिखंडी पथकात 45 हून अधिक सदस्य आहेत. हे संपूर्णपणे LGBTQ समुदायाचे आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी हे पथक सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात महाराष्ट्रभर आपली कला आणि मेहनतीचा ठसा उमटवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. शिखंडी फक्त ढोल-ताशा पथक नाही, तर बदलाचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement