TRENDING:

Mumbai MHADA : म्हाडासाठी अर्ज करताय? सावधान! घरासोबतच डिपाझिटचे पैसेही गमवाल, जाणून घ्या नवा नियम

Last Updated:

MHADA Mumbai : जर तुम्ही मुंबईत म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. म्हाडाने त्यांच्या नियमात मोठा बदल केलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत स्वतःचे घर घेण्याची संधी देत म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 118 घरांच्या विक्रीची नोंदणी सुरू केली आहे. ही घरे यापूर्वी दोन किंवा अधिक वेळा सोडतीत न विकली गेल्यामुळे आता लॉटरीशिवाय थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
MHADA Mumbai 118 flats first come first serve scheme details
MHADA Mumbai 118 flats first come first serve scheme details
advertisement

म्हाडाच्या नव्या अटीने खरेदीदारांची झोप उडवली

जर तुम्हीही या योजनेत घर खरेदीचा विचार करत असाल तर म्हाडाने जाहीर केलेल्या नव्या नियमांची अपडेट जाणून घ्या. या योजनेत अर्जदाराने अनामत रक्कम भरल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या एकूण किमतीपैकी 10 टक्के रक्कम भरावी लागेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास घरावरील दावा रद्द होईल आणि भरलेली अनामत रक्कम (1 ते 6 लाख रुपये) परत मिळणार नाही.

advertisement

17 फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात

17 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली असून शेवटचे घर विकले जाईपर्यंत ती सुरू राहणार आहे. 4 मार्चपासून अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. विशेष म्हणजे अर्जदाराकडे आधीपासून घर असले तरी या योजनेत घर घेता येणार आहे.

मुंबईत म्हाडाचं घर घेणं आता श्रीमंतांचीच चंगळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 ट्रॅक्टर उंबराची भाजी,गव्हाच्या चपात्या,102 वर्षांची महाप्रसादाची अनोखी परंपरा
सर्व पहा

या योजनेतील घरांच्या किमती 31 लाख रुपयांपासून थेट 8 कोटी रुपयांपर्यंत आहेत. मात्र परवडणाऱ्या घरांची संख्या मर्यादित असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही घरांच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही घरे खरेदीदारांना आकर्षित करतील की पुन्हा विक्रीअभावी राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai MHADA : म्हाडासाठी अर्ज करताय? सावधान! घरासोबतच डिपाझिटचे पैसेही गमवाल, जाणून घ्या नवा नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल