मुंबई म्हाडा मंडळाने यावेळी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ (First Come, First Serve) या तत्त्वावर घरविक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विक्रीविना राहिलेल्या घरांची विक्री करण्यात येणार असून, दिवाळीच्या काळात त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
BMC Homes : म्हाडाच्या स्पर्धेत BMC ची एंट्री! 426 घरांसाठी लॉटरी जाहीर; जाणून घ्या किंमत आणि लोकेशन
advertisement
200 घरांचा समावेश; सात कोटींची घरेही विक्रीला
या उपक्रमात सुमारे 200 घरं विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. यात ताडदेव, पवई (तुंगा) आणि इतर ठिकाणांतील विक्रीविना राहिलेल्या घरांचा समावेश असेल. ताडदेवमधील काही उच्च उत्पन्न गटातील सात कोटी रुपयांपर्यंत किमतीची घरेदेखील या योजनेत असणार आहेत.
19 वर्षांनंतर जुनी पद्धत परत
म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मुंबई मंडळातील अनेक प्रकल्पांमधील काही घरे दोन-तीन वेळा सोडत काढूनही विकली गेली नाहीत. हीच घरे आता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. आमचं उद्दिष्ट दिवाळीपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचं आहे.” 2006 पर्यंत म्हाडा अशा प्रकारे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर घरविक्री करत होता. त्यानंतर 2007 पासून सर्व घरे सोडतीद्वारे देण्यात येऊ लागली. मात्र आता तब्बल 19 वर्षांनंतर म्हाडा पुन्हा ही जुनी पद्धत वापरणार आहे.
महागड्या घरांना प्रतिसाद नाही
2023 मध्ये झालेल्या म्हाडा सोडतीत ताडदेव येथील ‘क्रिसेंट टॉवर’मधील सात घरांचा समावेश करण्यात आला होता. ही घरे साडेसात कोटी रुपयांना विक्रीसाठी ठेवली होती. मात्र, कोणत्याही अर्जदाराकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही सर्व घरे विक्रीविना राहिली. नंतर किंमत कमी करून सात कोटी करण्यात आली, तरीही ही घरे विकली गेली नाहीत. पवई आणि तुंगा भागातील काही घरेही अजून रिक्त आहेत. या सर्व रिक्त घरांचा एकत्रित समावेश करून म्हाडा दिवाळीच्या सुमारास विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. या तत्त्वानुसार जो अर्जदार सर्वप्रथम अर्ज करेल, त्यालाच पात्रतेनुसार घर मिळणार आहे.
मुंबईकरांसाठी नवी गृहसंधी
तब्बल दोन दशके उलटल्यानंतर म्हाडाकडून पुन्हा एकदा ‘First Come, First Serve’ तत्त्वावर घरविक्री सुरू होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात मुंबईकरांसाठी म्हाडाचं घर घेण्याची ही एक मोठी संधी ठरणार आहे.