Mumbai: मुंबई पोलिसांसाठी मोठी बातमी, शहरात उभारले जाणार आणखी 4 पोलीस स्टेशन, संपूर्ण यादी

Last Updated:

मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर नवीन चार पोलीस स्थानके, दोन नवीन परीमंडळ आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागास मंजुरी मिळाला

News18
News18
मुंबई: मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये आता ४ नवीन पोलीस स्टेशन्स उभारले जाणार आहे. चारही पोलीस स्टेशनला मंजुरीही देण्यात आली आहे.  महाराष्ट्र नगर,  गोळीबार पोलीस ठाणे
मढ मार्वे आणि असल्फा इथं हे चार पोलीस स्टेशन उभारले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर नवीन चार पोलीस स्थानके, दोन नवीन परीमंडळ आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागास मंजुरी मिळाला आहे. नववर्षाच्या तोंडावर गृहखात्याने मुंबई पोलिसांना भेट दिली आहे.
गृह खात्याकडून मिळाली मंजुरी
१) महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे
advertisement
२) गोळीबार पोलीस ठाणे
३) मढ मार्वे पोलीस ठाणे
४) असल्फा पोलीस ठाणे
अशी एकूण 04 नवीन पोलीस ठाणे असणार आहेत.  सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत 13 परिमंडळ आहेत. याची पुनर्रचनाकरुन 02 नवीन परिमंडळ कार्यरत करणार आहेत.  त्याचसोबत 03 नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण होणार आहेत. त्यामुळे या चारही भागात पोलीस स्टेशनमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता या चारही नव्या पोलीस स्टेशनमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबई पोलिसांसाठी मोठी बातमी, शहरात उभारले जाणार आणखी 4 पोलीस स्टेशन, संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement