PMC Election: पुणे फत्ते करण्याचा प्लॅन नागपूरात ठरला, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
PMC Election : लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील भाजप राजकरणाची गणिते बदलली आहेत.
पुणे महानगरपालिका भाजप आता स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित मानले दात आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले आहेत. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर उमेदवारी अर्ज देखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे महपालिका निवडणुका या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत. अखेर आज या संदर्भात आज नागपुरात एक बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिकांच्या गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार आता भाजपने निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरवात केली आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता पुण्यात आली होती. गिरीश बापट यांच्यानंतर आता पुण्यातील भाजपचा चेहरा म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. आज नागपुरात पुणे पालिका संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीला मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
advertisement
लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील गणिते बदलली
मागील (2017) महापालिका निवडणुकीत भाजपने 97 नगरसेवक निवडून महापालिकेची सत्ता काबीज केली. 2017 च्या निवडणुकीनंकर पाटील पुणे महापालिकेच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष देत होते . त्यावेळी पुणे महापालिकेतील अनेक निर्णय हे तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ हे घेत होते. मात्र, कोणत्याही निर्णयामध्ये पाटील यांचा शब्द अंतिम मानला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील भाजप राजकरणाची गणिते बदलली आहेत.
advertisement
नागपूरात घडामोडींना वेग
पहिल्यांदाच खासदार आणि राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मोहोळ यांचा केंद्रीय पातळीवरील नेत्यांची संपर्क वाढला. त्यामुळे पाटील यांच्याकडून पुण्याच्या कारभाराची सूत्रे मोहोळ यांच्या हाती देण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुका मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्यासोबत नागपुरात बैठक सुरू असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 12, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election: पुणे फत्ते करण्याचा प्लॅन नागपूरात ठरला, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग










