रविवार 24 ऑगस्ट रोजी पहाटे 2.35 वाजता दत्तानी मॉल परिसरात पाहणीदरम्यान “विंग्स ऑन फायर बार” आणि “पंखा फास्ट बार” येथे मोठा डीजेचा आवाज सुरू असल्याचे तसेच बाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण केल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असूनही हे बार मध्यरात्रीनंतर सर्रास सुरू असल्याचे दिसताच आमदारांनी तातडीने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
advertisement
स्नेहा दुबे पंडित काय म्हणाले?
यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या, “आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, पण कायदा मोडून रात्री 2.30 नंतर सुरू असणाऱ्या बारविरोधात आमची भूमिका ठाम आहे.”
वसई विरार शहरात रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. विशेषतः रात्री 1 वाजेपर्यंत बार बंद होणे गरजेचे असताना ते रात्री उशिरा पर्यंत चालविले जातात. मग अशा बार वर पोलीस कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ही आता करण्यात येत आहे.
तरुणाईकडून गैरकृत्याचे अनेक प्रकार
वसई विरार शहरात अनेक भागात बार अँड रेस्टॉरंट आहेत. यातील 'काही बार है' नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरा पर्यंत सुरू ठेवले जातात. अशा बारमध्ये मोठ्या प्रमाणात धांगडधिंगाना सुरूच असतो. तर काही वेळा बारच्या बाहेर सुद्धा मद्याच्या नशेत तरुणाईकडून गैरकृत्याचे प्रकार घडतात. तसेच अनेकदा मद्याच्या नशेत अपघातासारख्या घटना ही घडतात.
