TRENDING:

मुंबईतून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरायचे भन्नाट ट्रिक

Last Updated:

हे तिन्ही आरोपी आपल्या बांगलादेशातील नातेवाईकांशी आणि संपर्कातील लोकांशी संवाद साधण्यासाठी IMO या मोबाईल ॲपचा वापर करत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरातून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय गेल्या एका वर्षापासून मुंबई आणि परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या तिघांनाही पकडून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
advertisement

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे तिन्ही आरोपी आपल्या बांगलादेशातील नातेवाईकांशी आणि संपर्कातील लोकांशी संवाद साधण्यासाठी IMO या मोबाईल ॲपचा वापर करत होते. या ॲपच्या माध्यमातून ते इंटरनेट कॉलिंग करत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण जावे, असा त्यांचा उद्देश असावा, असा पोलिसांना संशय आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

हे तिघे भारतात नेमके कोणत्या हेतूने आले होते? त्यांना येथे कोणी आश्रय दिला होता का? आणि त्यांनी बनावट भारतीय कागदपत्रे बनवली आहेत का? या दिशेने पंतनगर पोलीस आता अधिक तपास करत आहेत. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी अशी बेकायदेशीर वस्ती करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता शोधमोहीम तीव्र केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापरायचे भन्नाट ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल