TRENDING:

Mumbai: मुंबईतील भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी अपघात, 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated:

भायखळा येथील हबीब मेन्शन इथं एका इमारतीच्या पायाभरणीचं काम सुरू होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश शिंदे, प्रतिनिधी 
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भायखळा परिसरात इमारतीचं काम सुरू असताना मातीच्या ढिगाराखाली दबून २ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  भायखळाच्या हबीब मेन्शन इथं शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. भायखळा येथील हबीब मेन्शन इथं एका इमारतीच्या पायाभरणीचं काम सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून इथं इमारतीच्या पाया भरण्याचं काम केलं जात आहे. आज शनिवारी अचानक ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कामगारांवर कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

advertisement

माती आणि चिखलाच्या ढिगाराखाली काही कामगार सापडले. या घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत राहुल ( वय ३० वर्षे) आणि  राजू ( वय २८) अशी मृतांची नाव आहे. तर इतर कामगारांना तातडीने मातीच्या ढिगाराखालून बाहेर काढलं.

या संपूर्ण दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. इमारतीच्या पायाभरणीच्यावेळी नेमकी ही दुर्घटना घडली कशी याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तर जखमींवर नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

advertisement

मृत्यू आणि जखमींची नावं खालीलप्रमाणे

१. राहुल, वय ३० वर्षे, मृत

२. राजू, वय २८ वर्षे, मृत

३. सज्जाद अली, वय २५ वर्षे, जखमी , स्थिर

४. सोबत अली, वय २८ वर्षे, जखमी , स्थिर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

५. लाल मोहम्मद वय १८ वर्षे, जखमी , स्थिर

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईतील भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी अपघात, 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल