मुंबई महापालिकेतर्फे वर्सोवा पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. आता या पुलाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या पुलाला हिरवा कंदिल दिला असून, केंद्र सरकारची परवानगी देखील मिळाली आहे. वर्सोवा पूल हा वर्सोवा-दहिसर सागरी किनारी मार्गाला देखील जोडण्यात येणार आहे. त्यामुळे अंधेरीतून थेट मढ आणि मढ येथून थेट सागरी किनारी मार्गावर जाता येईल. त्यामुळे 90 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
advertisement
पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!
मुंबई-ठाण्याला जोडणारा नवा रस्ता
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून देखील मढ-वर्सोवा हे दोन समुद्रकिनारे पुलाच्या माध्यमातून जोडण्यात येतील. वर्सोवा-मढ पूल हा मुंबई महापालिकेच्या वर्सोवा-दहिसर-भाईंदर सागरी किनारी मार्गाला देखील जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे जोडणारा आणखी एक जोडरस्ता तयार होणार आहे.
2100 कोटींचा प्रकल्प
मुंबई महापालिकेने हाती घेतलेला वर्सोवा पूल प्रकल्प हा 2100 कोटी रुपये खर्चाचा आहे. या प्रकल्पामुळे 22 किलोमीटरचे अंतर फक्त 1.5 किलोमीटरवर येणार आहे. पुलासाठी किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. आता केंद्राची पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
