सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात वर्धराज गुरुराज मिर्जी हे राहणारे आहेत. वर्धराज यांना नाटक पाहण्याची आवड शालेय जीवनापासून लागली असून आजवर ते जोपासत आहेत. तसेच नाटक पाहून आलेल्या तिकिटाचे संकलन सुद्धा वर्धराज मिर्जी करत आहेत. नाटक पाहता पाहता त्या नाटकाचे तिकीट जोपासून ते जपून ठेवण्याचं काम वर्धराज मिर्जी करत असून त्या तिकिटांचा छानपैकी अल्बम सुद्धा बनवला आहे.
advertisement
Success Story : शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, शेतकरी करतोय महिन्याला 125000 कमाई, कसं मिळवलं यश?
वर्धराज यांनी आजपर्यंत पाहिलेली नाटकं आणि त्या तिकिटांचे संकलन तारखेनुसार त्या अल्बममध्ये लावलेले आहे. तिकिटाचे संकलन करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कलाकारांचे फोटो, दिग्दर्शक कोण होतं, लेखक कोण होतं, स्थान, त्या नाटकाचा दर काय होता, त्या नाटकाला गर्दी किती होती, या सर्व आठवणींचा मागोवा घेण्यासाठी वर्धराज मिर्जी नाटकाच्या तिकिटाचे संकलन करत आहेत.
एका बँकेत काम करणारे वर्धराज मिर्जी यांनी आतापर्यंत 55 ते 60 नाटकं पाहिली असून 150 पेक्षा अधिक नाटकांच्या तिकिटाचे संकलन त्यांनी केले आहे. सोलापुरातील असणारे सर्व नाटक पाहण्यासाठी वर्धराज मिर्जी हे आवर्जून जातात. तर पुणे किंवा इतर ठिकाणी असलेले नाटक पाहण्यासाठी ते शनिवारी किंवा रविवारी जातात. तर कधी कधी बँकेत सुट्टी टाकून सुद्धा वर्धराज हे नाटक पाहण्यासाठी जातात. नाटकाला खूप चांगले दिवस आले असून सर्वांनी नाटक पहावे. कारण नाटकात कोणत्याही प्रकारचा रिटेक नसतो, अभिनेत्री, अभिनेता यांच्या अभिनयाचा जिवंतपणा पहायचा असेल तर नाटक पहावे, असे आवाहन नाटक प्रेमी वर्धराज मिर्जी यांनी केले आहे.





